Mumbai BMC Budget 2025: मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात स्वच्छता, रस्ते आणि पर्यटनासाठी मोठा निधी

Mumbai BMC Budget 2025: मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात स्वच्छता, रस्ते आणि पर्यटनासाठी मोठा निधी

मुंबई महानगरपालिकेचा ७४४२७.४१ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर, स्वच्छता, रस्ते आणि पर्यटनासाठी मोठा निधी. भूषण गगराणी यांनी पहिल्यांदाच सादर केलेला अर्थसंकल्प, विविध विकास कामांसाठी ४३१६५.२३ कोटी रुपयांची तरतूद.
Published by :
Prachi Nate
Published on

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा ७४४२७.४१ कोटींचा आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज जाहीर झाला. आयुक्त आणि प्रशासक म्हणून भूषण गगराणी यांनी पहिल्यांदाच हा अर्थसंकल्प सादर केला आहे, तर प्रशासकीय राजवटीतील तिसरा अर्थसंकल्प आहे.

‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षणाचा भाग म्हणून मुंबईकरांना कचरा संकलन शुल्क लावले जाण्याची शक्यता आहे. हा अर्थसंकल्प ९२४६.६२ कोटींनी जास्त असून आगामी अर्थसंकल्प १४.१९ टक्क्यांनी अधिक आहे. रस्त्यांचे सुरू असलेले काँक्रीटीकरण तसेच मोठ्या प्रकल्पांसाठी महापालिकेला मोठा निधी खर्च करावा लागला आहे. यामुळे विविध विकास कामांसाठी ४३१६५.२३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पर्यटनवाढीबाबत मुंबई महापालिकेने जाहीर केल्या 'या' योजना

  • पर्यावरण खात्याकरिता 113.18 कोटींची तरतूद

  • राणीच्या बागेत पेंग्वीन आणि वाघानंतर आता जिराफ, झेब्रा, सफेद सिंह, जॅग्वार या विदेशी प्राण्यांचा समावेश करणार

  • संजय गांधी नॅशनल पार्कच्या जमिनीखालील बोगदा करून वाघाचे शिल्प उभारणार

  • लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उभारणार

  • मुंबई शहरातील कोळीवाड्यांच्या विकासासाठी 25 कोटी देण्यात येणार

  • काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल तसेच रिगल जंक्शन परिसराचा विकास केला जाणार

'या' कामासाठी एवढा खर्च

  • बेस्ट साठी 1000 कोटींची तरतूद

  • बेस्ट उपक्रमासाठी 11304.59 कोटी इतक्या रकमेचे अर्थसहाय्य

  • रस्ते व वाहतूक खात्याकरिता 5100 कोटींची तरतूद करणार

  • दहिसर ते भाईंदरपर्यंतच्या कोस्टल रोड प्रकल्पासाठी 4300 कोटींची तरतूद करणार

  • गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता 1958 कोटींची तरतूद करणार

  • आरोग्य खात्याचे बजेट 7379 कोटी

  • शिक्षण खात्याचे बजेट 3955 कोटी

  • मिशन व्हिजन 27, मिशन संपूर्ण हे दोन मिशन शिक्षण खात्याकडून राबवणार

  • झोपडपट्टीतील व्यावसायिक गाळेधारकांना कर लागणार आहे.

  • झोपडपट्टीतील गाळेधारकांकडून 350 कोटींचा महसूल अपेक्षित

  • बांधकाम प्रकल्पांसाठी 28 मुद्द्यांची मार्गदर्शक सूचना

  • सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी 5545 कोटी, मल निसारण प्रचालनासाठी 2477 कोटी.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com